26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयभाजपाचे ‘मिशन दक्षिण’

भाजपाचे ‘मिशन दक्षिण’

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : येथे भाजपाच्या दोन दिवसीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. २ आणि ३ जुलैला आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत.

१८ भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी होणर आहेत. बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत.

सुमारे १८ वर्षांनंतर, हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. या अगोदर २००४ साली हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. ही बैठक तेलंगणासाठी महत्वाची असल्याचे सांगितले जात आहे.

पुढच्या वर्षी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपाने आपली कंबर कसली आहे. ‘मिशन दक्षिण’ अजेंड्याखाली भाजपा दक्षिण भागातील अधिकाधिक मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

फडणवीस सभेला येणार?
हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सरचिटणीसांच्या बैठकीने होणार आहे. ज्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, ३ आणि ४ जुलैला होणा-या महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात फडणवीस व्यस्त असल्यामुळे त्यांची या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी दिसत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या