26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयभाजपची ६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

भाजपची ६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी आपल्या ६ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. यात धोराजीतून महेंद्रभाई पाडलिया, भावनगर पूर्वमधून सेजल पांड्या, खंभालियातून मुलूभाई बेरा, कुतियानातून ढेलीबेन ओडेदरा, डेडियापारातून हितेश वसावा व चोर्यासीतून संदीप देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने आतापर्यंत एकूण १६६ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

भावनगर पूर्वच्या आमदाराचे तिकीट कापले
भाजपने भावनगर पूर्व मतदार संघातील विद्यमान आमदार विभावरी दवे यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या जागी सेजल पांड्या यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने पहिल्या यादीत तब्बल ३८ आमदारांना तिकीट नाकारले होते.

पहिल्या यादीत ५ मंत्र्यांना मिळाले नव्हते स्थान
भाजपने १० नोव्हेंबर रोजी १८२ विधानसभा मतदार संघांपैकी १६० जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोढिया येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरील. येथे त्यांना काँग्रेसच्या उमेदवार एमी याज्ञिक आव्हान देतील. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या जागी डॉक्टर दर्शिता सिंह राजकोट पश्चिम येथून निवडणूक लढवली.

दुसरीकडे, भाजपने विद्यमान सरकारमधील ५ मंत्र्याचेही तिकीट कापले आहे. यात राजेंद्र त्रिवेदी व प्रदीप परमार सारख्या दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. पक्षाने कामगिरीच्या आधारावर या सर्वांना तिकीट नाकारले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या