24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरात स्फोट; २ लष्करी अधिकारी शहीद

जम्मू-काश्मीरात स्फोट; २ लष्करी अधिकारी शहीद

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ अचानक झालेल्या ग्रेनेडच्या स्फोटात भारतीय लष्करातील दोन अधिका-यांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लष्करातील कॅप्टन आणि एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा समावेश आहे. तर, या दुर्घटनेत अन्य पाच जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मेंढर सेक्टरमध्ये ही घटना घडली.

तेव्हा लष्कराचे जवान ड्युटीवर होते. घटनेनंतर जखमी कॅप्टन आणि जेसीओ यांना उपचारासाठी उधमपूरला नेण्यात आले, मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कॅप्टन आनंद आणि नायब-सुभेदार (जेसीओ) भगवान सिंह असे ग्रेनेडच्या अपघातात मृत्यू झालेल्या लष्करी अधिका-यांची नावे आहे. तर इतर पाच जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती लष्कराच्या अधिका-यांनी दिली आहे.

रविवारी रात्री उशिरा पुंछमधील मेंढार सेक्टरमध्ये ही घटना घडली. घटनेवेळी लष्कराचे जवान ड्युटीवर होते. घटनेनंतर जखमींना तातडीने उधमपूरला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या दोन्ही अधिकारी शहीद झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या