26.3 C
Latur
Sunday, March 26, 2023
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मिरात हिमवादळ

जम्मू-काश्मिरात हिमवादळ

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. येथे हिमवादळाचा जोरदार फटका बसत आहे. गुरेजमधील तुलेल परिसरातील दोन गावांमध्ये हिमस्खलन झाले आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमस्खलनामुळे नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत.

गुरेज सेक्टकमध्ये शुक्रवारी हिमस्खलन झाल्यामुळे नद्द्यांच्या किशनगंगा नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे या परिसरात जलसंकट निर्माण झाले आहे. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठीही हाल होत आहेत. काश्मीर खो-यात यंदाच्या मोसमातील मोठी बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. जम्मू-काश्मीरच्या गुरेझमधील तुलेल परिसरात हिमवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. येथील दोन गावांमध्ये हिमस्खलन झाले आहे. या हिमस्खलनामुळे किशनगंगा नदीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. हिमस्खलनामुळे येथील विजिर्थल आणि नीरू गावात पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
गुगरान तुलेलमध्ये हिमस्खलनामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रशासनाकडून या या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. प्रशासनाने नागरिकांना सर्तकतेचे आवाहन केले आहे. हवामान सुधारेपर्यंत प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्यास आणि किशनगंगा, पर्वत किंवा हिमस्खलनाचा धोका असलेल्या ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्येही बर्फवृष्टी
पर्वतीय प्रदेशांमध्ये हिमवर्षाव सुरुच आहे. जम्मू आणि काश्मीरसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही सतत बर्फवृष्टी सुरू आहे. हिमाचल प्रदेशातील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे. हिमवृष्टीनंतर हिमाचल प्रदेशमधील २०८ रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.

हलक्या पावसाच्या सरी सुरू
बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहेब, रुद्रनाथ, नंदा घुंघटी, लाल माटी या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बर्फवर्षाव सुरु आहे. सखल भागात अजूनही हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर दुसरीकडे बर्फवृष्टीमुळे गंगोत्री धाममधील मंदिर पूर्णपणे झाकले गेले आहे. बर्फवृष्टीमुळे यमुनोत्री महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बर्फ हटविण्याचे काम सुरु आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या