23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयनाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला भारतात परवानगी

नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला भारतात परवानगी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या देशात वेगाने सुरू आहे. लसीच्या पहिल्या दोन मात्रांसह बुस्टर डोसही सध्या देशात दिला जात आहे. अशातच आता बहुप्रतिक्षित नाकावाटे दिली जाणारी लस तयार झाली आहे. या लसीच्या वापरालाही परवानगी देण्यात आली आहे.

भारत बायोटेकला डीसीजीआयकडून नाकावाटे दिल्या जाणा-या कोविड १९ लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नाकावाटे दिली जाणारी ही भारतातली पहिली कोरोना प्रतिबंधक लस असेल.

कशी आहे ही लस?
इतर लसी दंडात दिल्या जातात. यामध्ये औषध स्रायूंमध्ये जाणे गरजेचे असते. मात्र ही नवी लस स्रायूत देण्याची गरज नाही. नाकामध्ये दोन ते तीन थेंब टाकून ही लस देण्यात येते. नाक चोंदल्यास आपण जो स्प्रे वापरतो, त्याप्रमाणेच ही लस देता येणार आहे. भारत बायोटेकने घेतलेल्या चाचण्यांमध्ये या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स आढळून आले नाहीत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या