26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयएक लाखाहून अधिकांचा रक्तदानाचा विक्रम

एक लाखाहून अधिकांचा रक्तदानाचा विक्रम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी जनतेने त्यांना खास गिफ्ट दिले. शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या रक्तदान मोहिमेत लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि जागतिक विक्रम केला. या एका दिवसात एक लाखाहून अधिक लोकांनी रक्तदान केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या रक्तदान मोहिमेत लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यापूर्वी २०१४ मध्ये एकाच दिवसात ८७,०५९ लोकांनी रक्तदान केले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आरोग्य मंत्री मांडविया यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी १५ दिवसांची रक्तदान मोहीम सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी एक लाखाहून अधिक लोकांनी रक्तदान केले, हा एक ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ आहे. यापूर्वी ६ सप्टेंबर २०१४ रोजी ८७,०५९ जणांनी रक्तदानात सहभागी होऊन विक्रम केला होता.

तीनशे शहरांत ५५६ रक्तदान शिबिरे
हा कार्यक्रम अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेनं आयोजित केला होता आणि त्यासाठी भारतातील तीनशे शहरांमध्ये ५५६ रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली होती. मांडविया यांनी स्वत: दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमधील एका शिबिरात रक्तदान केले होते आणि लोकांना रक्तदान अमृत महोत्सवावर रक्तदान करण्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅप किंवा ई-रक्तकोश पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले होते.

आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी
या मोहिमेची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ही मोहीम १५ दिवस चालणार आहे. रक्तदान करण्यास इच्छुक असलेले लोक रक्तपेढीच्या पोर्टलवर नोंदणी करू शकतात. यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅपवरही नोंदणी करता येईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या