Tuesday, September 26, 2023

देशातील ८ समुद्रकिना-यांना ब्लू फ्लॅगचा दर्जा

नवी दिल्ली : भारतातील एकूण ८ समुद्रकिना-यांना ब्लू फ्लॅगचा दर्जा प्राप्त झाला आहे. फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशनच्या पंचांनी डेनमार्कच्या वैज्ञानिकांच्या आणि पर्यावरणतज्ज्ञांचा निर्णय योग्य ठरवला आहे. यामुळे ८ भारतीय समुद्रकिना-यांचे नाव जगभरातील सर्वात स्वच्छ समुद्रकिना-यांच्या यादीत नोंदवले गेले. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या सन्मानाबाबत आनंद व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘क्लीननेस ऑफ बीचेस’ अभियानाचा उल्लेख केला.

ब्लू फ्लॅग प्राप्त झाल्याबद्दल आपल्याला आनंद होत असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. हा भारतासाठी अभिमानाचा विषय असून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला ब्लू फ्लॅगची मान्यता मिळाली आहे. हे समुद्रकिनारे अधिक विकसित करण्याच्या योजनेवर काम केले जाईल, असे जावडेकर म्हणाले. यामुळे पर्यटनविकासाला चालणा मिळणार असल्याचेही सांगण्यात आले़

ही आहेत ती ८ समुद्रकिनारे
ब्लू टॅग प्राप्त करणा-या समुद्रकिना-यामध्ये शिवराजपूर (गुजरात), घोघला (दीव), कासरकोड आणि पदुबिद्री (दोन्ही कर्नाटकामध्ये), कप्पड (केरळ), रुशिकोंडा (आंध्र), गोल्डन (ओडिशा) आणि राधानगर (अंदमान) यांचा समावेश आहे.

५० देशांमध्ये भारताचा समावेश
ब्लू फ्लेग सर्टिफिकेशन भारताच्या कउेट प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या योजनांपैकी एक होते. या बरोबरच भारताचा आता जगभरातील ५० ब्लू फ्लॅग देशांच्या यादीत समावेश झाला आहे.

स्पेन अव्वलस्थानी
आंतरराष्ट्रीय पंचांनी ४ हजार ६६४ समुद्रकिना-यांना ब्लू फ्लॅग टॅग दिला. सध्यस्थितीत स्पेनच्या सर्वाधिक समुद्रकिना-यांना हा टॅग मिळाला आहे. या पूर्वी भारतातील एकाही समुद्रकिना-याला हा टॅग मिळालेला नव्हता. मात्र, आता भारतातील एकूण ८ समुद्रकिना-यांना हा टॅग मिळालेला आहे.

महाराष्ट्रात डिसेंबरपूर्वी राष्ट्रपती राजवट ! – प्रकाश आंबेडकर

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या