27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयगोवा अपघातातील ४ प्रवाशांचे मृतदेह सापडले

गोवा अपघातातील ४ प्रवाशांचे मृतदेह सापडले

एकमत ऑनलाईन

पणजी : गोव्यातील झुआरी पुलावरून कोसळून झालेल्या अपघातग्रस्त कारचा शोध घेण्यात बचाव पथकाला १२ तासांनंतर यश आले असून, यात गाडीतील सर्व चारही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मध्यरात्री एकच्या सुमारास घडला होता. मात्र, काळोखामुळे शोधकार्यात अडचणी येत असल्याने रात्रीच्यावेळी शोधकार्य थांबवण्यात आले होते. मात्र, आता कार आणि त्यातील प्रवाशांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

आल्विन आरावजी, हेन्री आरावजो, प्रेसिला क्रुझ, ऑस्टिन फर्नांडिस अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातग्रस्त गाडी लोटली येथून पणजीच्या दिशेने निघाली होती. हा अपघात एवढा भीषण होता ज्यात कारचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला आहे.
कसा घडला अपघात

घटनेपूर्वी अपघातग्रस्त वाहनाच्या पुढे असलेल्या एका टॅक्सी चालकाने त्याचा वाहनाच्या साईड आरशामध्ये मागून येणारी ही गाडी पाहिली होती. ही गाडी भरधाव वेगात होती. त्यावेळी या गाडीने एका टॅक्सीला ओव्हरटेक करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी उजव्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठडयाला धडकून नदीत कोसळली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या