24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयकेमिकल फॅक्टरीत बॉयलर स्फोटात १२ ठार

केमिकल फॅक्टरीत बॉयलर स्फोटात १२ ठार

एकमत ऑनलाईन

२१ जखमी, उत्तर प्रदेशातील कंपनीत स्फोट
हापूर : बॉयलरचा स्फोट झाल्याने केमिकल फॅक्टरीला आग लागली. या आगीत १२ मजूर जिवंत जळाले, तर २१ मजूर गंभीर भाजले. ही घटना उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये शनिवारी घडली. जोरात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत अनेक मजूर होरपळले. जळालेल्या लोकांना मेरठ आणि गाझियाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटामुळे जवळपासच्या तीन कारखान्यांचे नुकसान झाले.

हापूर जिल्ह्यातील धौलाना भागात यूपीआयडी कारखाना आहे. या कारखान्यात केमिकल बनवले जाते. शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा आवाज करीत बॉयलर फुटल्याने आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत १२ मजूर जिवंत जळाले, तर २१ मजूर गंभीर भाजले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलानेही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

या घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला आणि या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचनाही दिल्या. ज्या कारखान्यात हा अपघात झाला त्या कारखान्यात फक्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवण्यास परवानगी होती. मात्र, येथे नेमके काय घडत आहे याची चौकशी केली जाईल, असे डीएम मेधा रुपम म्हणाल्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

मालक आणि ठेकेदारावर गुन्हा
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून आयुक्त, एडीजी आणि आयजी घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. कारखान्यात बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून निघणा-या ठिणगीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कारखाना मालक आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाचणीसाठी नमुने घेतला
फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून तपासणीसाठी नमुने घेतले आहेत. स्फोटाची कारणे इतर ठिकाणी तपासली जात आहेत. तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे आयजी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या