28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयबोलेरोची जेसीबीला जोरदार टक्कर; टुव्हीलर वाहनचालक बचावला

बोलेरोची जेसीबीला जोरदार टक्कर; टुव्हीलर वाहनचालक बचावला

एकमत ऑनलाईन

पहा थरारक व्हिडिओ….पण हे शक्य आहे का?

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियात एका अपघाताचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे,अपघातात एका दुचाकीस्वाराचा जीव वाचला, बोलेरो कार आणि जेसीबीच्या धडकेत या दुचाकीस्वाराचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडीओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत रस्त्यावरुन वाहनांची आवाजावी सुरु आहे. यात मोठ्या वाहनांपासून छोट्या वाहनांचा समावेश असतो. जवळच्या एका सीसीटीव्हीत या अपघाताची दृश्य कैद झाली आहेत. या दरम्यान एक जेसीबी मशीन रस्त्यावरुन जात असताना चालकाचा ताबा सुटतो आणि जेसीबी दुचाकीस्वाराच्या दिशेने येतो.

बाईकस्वाराचं त्याकडे लक्ष नसतं. तो बाईकवर बसलेला असताना एक वेगवान बोलेरो कार दुसऱ्या बाजूने येते आणि जेसीबीला टक्कर देते. जेसीबी कार रस्त्यावर खाली येतो, तर बोलेरो कार अपघातस्थळी टर्न घेऊन थांबते. या सर्व घटनेत दुचाकीस्वाराला काहीच होत नाही, कारण त्याच्या आणि जेसीबीच्या मध्ये बोलेरो कार येते. हा व्हिडीओ देशातील कोणत्या भागातला आहे याची माहिती नाही, पण सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यासोबत लिहिलं आहे की, हे दृश्य पाहिलं तर असं वाटतं बोलेरो जिवंत वस्तू बनली आणि दुचाकीस्वाराचा जीव वाचवणं त्याचे मिशन आहे.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

Read More  फॉरेन्सिक रिपोर्ट आला : सुशांतच्या मृत्यूमागे कुठलाही घातपातअसण्याची शक्याता फेटाळली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या