22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयइंदौरमध्ये बॉम्बस्फोट, २ ठार, १५ जखमी

इंदौरमध्ये बॉम्बस्फोट, २ ठार, १५ जखमी

एकमत ऑनलाईन

इंदौर : मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये २ पक्षांमध्ये झालेल्या वादानंतर बॉम्बस्फोटाचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला, तर १५ हून अधिक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी तणावाचे वातावरण पाहता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना इंदौरमधील बडगोंड पोलिस स्टेशन हद्दीतील बेरछा भागात घडली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार बडगोंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेरछा गावात दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही बाजूचे लोक समोरासमोर आले. त्याचवेळी एक तरुण बॉम्ब घेऊन घटनास्थळी पोहोचला. तेथे १५ ऑगस्टची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामस्थांचीही गर्दी जमली होती. या तरुणाने गर्दीत जाऊन बॉम्ब फोडल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी स्फोट झालेला बॉम्ब लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोट एवढा जोरदार असल्याचे सांगण्यात येत आहे की आसपासच्या गावातही भीतीचे वातावरण पसरल आहे. बॉम्बस्फोट करणा-या तरुणाचाही यामध्ये मृत्यू झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या