24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयकेरळच्या कन्नूरमध्ये बॉम्बस्फोट

केरळच्या कन्नूरमध्ये बॉम्बस्फोट

एकमत ऑनलाईन

कन्नूर : केरळच्या कन्नूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. येथे बॉम्बस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या घराजवळ झाला आहे. मत्तनूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएसएस कार्यकर्ता सुधीश यांच्या घरापासून ५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाही घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर जिल्ह पोलिस अधिक्षकांनी घटनेची पहाणी केली आहे. पोलिसांनी सांगितल की सुधीर हा काही घटनांमध्ये आरोपी आहे. झालेल्या घटनेचा तपास चालू आहे.

दरम्यान गेल्या महिन्यात एक बॉम्बस्फोटानंतर स्थानिक आरएसएस आणि सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया यांच्या कार्याकर्त्यांन मध्ये हाणामारी झाली होती. तर दुस-या घटनेत, शुक्रवारी कन्नवममध्ये माजी एसडीपीआय कार्यकर्ता सलाहुद्दीन यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या