22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeराष्ट्रीयइराणच्या विमानात बॉम्बची धमकी

इराणच्या विमानात बॉम्बची धमकी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इराणमधील एका प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. हे विमान इराणहून चीनच्या दिशेने जात आहे. मात्र भारतीय हवाई हद्दीत आल्यानंतर या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. भारताने या विमानाला दिल्लीत उतरण्यास परवानगी नाकारली असून भारतीय वायू दल सतर्क झाले आहे. सुरक्षा यंत्रणांकडून या विमानावर लक्ष ठेवले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इराणमधील एका प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला जात आहे. हे विमान इराणहून चीनकडे जात होते. मात्र भारतीय हवाई हद्दीत आल्यानंतर या विमानात बॉम्ब असल्याचा माहिती वैमानिक तसेच इराण विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवणा-या यंत्रणेला मिळाली आहे. या माहितीनंतर वैमानिकाने या विमानाला दिल्ली विमानतळावर उतरण्यास परवानगी मागितली होती. मात्र दिल्ली विमानतळ प्रशासनाने ही परवानगी नाकारली आहे. त्यानंतर हे विमान आता चीनच्या दिशेने रवाना झाले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा या विमानावर लक्ष ठेवून आहेत.

जयपूरला विमान उतरवण्यास वैमानिकाचा नकार
हे विमान इराणमधील तेहरान येथून चीनमधील गुआंगझोऊ येथे जात होते. मात्र विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर महान एअरने विमान दिल्लीत उतरवण्यासाठी परवानगी मागितली. दिल्लीने विमानतळ प्रशासनाने ही परवानगी नाकारत विमान जयपूरच्या विमानतळावर उतरवण्याची सूचना केली. मात्र वैमानिकाने विमान जयपूरला उतरवण्याचा नकार देत भारताची हवाई हद्द सोडली आहे. सध्या हे विमान चीनच्या दिशेने जात आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या