22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयबोम्मई यांच्याकडे आठ खात्यांचा भार

बोम्मई यांच्याकडे आठ खात्यांचा भार

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे खात्याची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर आधीच कामाचा बोजा अधिक असताना आता दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांच्याकडील वन आणि अन्न व नागरी पुरवठा खाते बोम्मईकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोम्मई यांच्याकडे ग्रामीण विकास आणि पंचायत राज, बंगळूर शहर विकास आणि वित्त यासह आठ खात्यांचा भार असेल.

पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंगळूरसाठी योग्य मंर्त्याची नियुक्ती न केल्याबद्दल बोम्मईंवर विरोधकांकडून टीका होत आहे. बोम्मईनी बंगळूर शहर विकास खाते स्वत:कडे ठेवला आहे. तसेच त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करता आलेला नाही. मंत्रिमंडळात आता सहा पदे रिक्त आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या