23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयरेल्वेसाठी महिन्यात २४ तिकिटे बुकिंगची मुभा

रेल्वेसाठी महिन्यात २४ तिकिटे बुकिंगची मुभा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रेल्वेने तिकीट बुकिंग नियमांत बदल केला असून, नव्या नियमांनुसार रेल्वे प्रवासी जास्तीत जास्त तिकिटे ऑनलाइन बुक करू शकतील. एका महिन्यात ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी ज्यांचे लॉगिन आयडी आधारशी लिंक केलेले नाही, त्यांची संख्या ६ वरून १२ वर आली आहे, तर आधार लिंक युजर आयडी असलेल्या ग्राहकांसाठी जास्तीत जास्त तिकीट बुक संख्या १२ वरून २४ करण्यात आली आहे. जे लोक वारंवार ये-जा करतात, त्यांच्यासाठी ही सुविधा खूप उपयुक्त आहे.

यासोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी तिकीट बुक करण्यासाठी समान आयडी वापरणा-यांना याचा फायदा होणार आहे. रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी नेहमीच मर्यादा येत असतात. याचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमावलीत बदल केला असून, आता एका व्यक्तीच्या तिकीट बुकिंगची मर्यादा वाढविण्यात आली आहे. त्यामध्ये ज्याचे लॉगिन आयडी आधारशी लिंक केलेले नाही, त्याला आता १२ तिकिटे बुक करता येणार आहेत. म्हणजेच सध्याच्या तुलनेत ही संख्या दुप्पट झाली आहे. तसेच आधारशी लिंक असलेल्या युजर आयडीच्या ग्राहकांनादेखील आता २४ तिकीट बुक करता येणार आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणा-यांची सोय झाली आहे.

त्यासाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत ई-तिकिटिंग वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तेथे लॉग ईन करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर मुख्य पृष्ठावरील माय खाते विभागात आधार केवायसीवर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक टाकून ओटीपी पाठवावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आधार कार्डवर नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर आधारशी संबंधित माहिती पाहिल्यानंतर खाली लिहिलेल्या व्हेरिफायवर क्लिक करा. त्यानंतर मोबाईलवर तुमचा केवायसी तपशील यशस्वीरित्या अपडेट केला आहे की नाही, यासंबंधी एक संदेश येईल.

आतापर्यंत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने आधार कार्ड लिंक केलेल्या खात्याशिवाय एका महिन्यात ६ तिकिटांची बुकिंग करण्याची परवानगी दिली होती. त्याचवेळी आधार कार्ड लिंक केलेल्या खात्याने १ महिन्यात १२ तिकिटे बुक करण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता नव्या नियमानुसार यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

जास्त रेल्वे प्रवास करणा-यांना दिलासा
या निर्णयावर बोलताना रेल्वे अधिकारी म्हणाले की, रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वेने जास्त प्रवास करणा-यांना दिलासा मिळणार आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी एका खात्यातून तिकीट बुक करणा-यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

रेल्वेची प्रवाशांसाठी अनेक भाषांमध्ये सुविधा
रेल्वे प्रवाशांसाठी नेहमीच जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करते. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे एका हेल्पलाइन क्रमांकाच्या माध्यमातून माहिती देण्याचे काम करते. १३९ हा भारतीय रेल्वेच्या आयव्हीआरएस म्हणजेच इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टमवर आधारित एक हेल्पलाइन क्रमांक आहे. यामध्ये अनेक भाषांमध्ये माहिती दिली जाते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या भाषेची मदत घेता येणार आहे.

वैद्यकीय मदतीसाठी १ नंबर दाबावा
यासोबतच सुरक्षा, वैद्यकीय मदत, अपघाताच्या माहितीसाठी १ नंबर दाबावा लागेल. याशिवाय जर तुम्हाला ट्रेनशी संबंधित चौकशी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला २ नंबर दाबावे लागतील.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या