20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeराष्ट्रीयसीमेवरील परिस्थिती नियंत्रणात

सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात

एकमत ऑनलाईन

देहरादून: गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण होते. परंतु आता तणावाचे वातावरण कमी होताना दिसत आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली. देहरादून येथील सैन्य अकादमीमध्ये शनिवार दि़ १३ जून रोजी पासिंग आऊट परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते बोलत होते.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावावरून केंद्र सरकारवरही निशाणा साधण्यात येत होता. तसेच, अनेकांनी याबाबत चिंताही व्यक्त केली होती. अशा परिस्थितीतच लष्कर प्रमुख नरवणे यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आश्वासन देशवासीयांना दिला. चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमा पूर्णपणे नियंत्रणात आहेत, याचे आश्वासन देतो. तसेच, चीनसोबत आमची कमांडर स्तरावरील बैठकीचे सत्र सुरू आहे, असे नरवणे म्हणाले.
याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरही समान रँकच्या कमांडर्ससोबत चर्चां सुरू आहेत. त्याद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरही समान रँकच्या कमांडर्ससोबत चर्चां सुरू आहेत. त्याद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नेपाळसोबत उत्तम संबंध
नेपाळसोबत सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले. आमचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध आहेत. दोन्ही देशांच्या लोकांना एकत्र जोडण्यासाठी आमच्याकडे चांगल्या व्यक्ती आहे. आमचे संबंध कायम उत्तम होते आणि भविष्यातही राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

३३३ भारतीय आणि ९० परदेशी कॅडेट्सने केले प्रशिक्षण पुर्ण दि. १३ जून शनिवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास सर्व कॅडेट्स आयएमएच्या मैदानावर पोहोचले होते. त्यानंतर परेड सुरू झाली. सर्वप्रथम डिप्टी कमांडेंट यांनी परेडला सलामी दिली. त्यानंतर कमांडेंट लेफ्टनंट जनरल जयविर सिंह नेगी यांनी परेडची सलामी स्वीकारली. त्यानंतर लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी परेडचे निरिक्षण केले. भारताच्या ३३३ कॅडेट्सने आपले प्रशिक्षण पूर्ण केले. यासोबतच ९० परदेशी कॅडेट्सही यात सहभागी झाले होते. त्यांनीदेखील आयएमएमधून आपले प्रशिक्षण पूर्ण केले.

यावर्षी प्रथमच कुटुंबीयांच्या गणवेशावर स्टार नाही

कोरोना संकटादरम्या पार पडलेल्या परेडमध्ये प्रोटोकॉल पूर्णपणे पाळले हेले. तसंच कॅटेड्सने मास्क परिधान करून परेड केली. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले नव्हते. दरम्यान, या परेडचे युट्यूबर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते़ यावेळी नरवणे यांनी कॅडेट्सच्या कुटुंबीयांना संबोधितही केले. आजवर ही तुमची मुले होती आता ती आमची झाली आहे, असे ते यावेळी म्हणाले. तसेच, अकादमीच्या इतिहासात प्रथमच कॅडेट्सच्या कुटुंबीयांच्या त्यांच्या गणवेशावर स्टार लावता आले नसल्याचेही दिसले.

Read More  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर : कर्जाची वसुली ३१ ऑगस्टपुर्वी करू नका

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या