34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeआंतरराष्ट्रीयब्राझीलचा 'कोव्हॅक्सिन' लस घेण्यास नकार

ब्राझीलचा ‘कोव्हॅक्सिन’ लस घेण्यास नकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ब्राझीलच्या आरोग्य विभागाने भारत बायोटेकची कोरोना लस आयात करण्यास नकार दिला आहे. जीएमपी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ब्राझीलने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येतंय. ब्राझीलने कोव्हॅक्सिनच्या दोन कोटी डोसची ऑर्डर दिली होती. परंतु, आता ब्राझीलच्या हेल्थ रेग्युलेटरने भारतातून ही लस आयात करण्यास नकार दिला आहे.

लस उत्पादनाच्या चांगल्या उत्पादनाचे नियम पाळले गेले नाही, ज्यामुळे कोवाक्सिनला आयात करण्यास मान्यता मिळाली नाही असे ब्राझील सरकारने जारी केलेल्या राजपत्रात असे म्हटले आहे. यावर लस निर्माता भारत बायोटेकची प्रतिक्रिया समोर आली आहे. या विषयावर ब्राझीलशी चर्चा सुरू आहे.तपासणी दरम्यान नमूद केलेल्या आवश्यकता पूर्ण केल्या जातील असे सांगण्यात आले. दरम्यान, इराण, नेपाळ, मॉरिशस, पराग्वे आणि झिम्बाब्वेसह इतर अनेक देशांनी आपत्कालीन वापरासाठी कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे.

केंद्राचा सामन्यांना झटका; बचत योजनांवरील व्याजदरात मोठी कपात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या