24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयइंधनदर न वाढणे ब्रेकिंग न्यूज - राहुल गांधी

इंधनदर न वाढणे ब्रेकिंग न्यूज – राहुल गांधी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ज्या दिवशी इंधनदरवाढ झाली नाही ती ब्रेकिंग न्यूज होत असल्याचा उपरोधिक टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना मारला आहे़ कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी याआधीही कोरोना व्हायरस, लस आणि विविध मुद्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यानंतर आता परत एकदा वाढत्या इंधन दरावरून हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. मोदी सरकारच्या विकासाची अशी परिस्थिती आहे की, जर एखाद्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत तर ती जास्त मोठी बातमी होते, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

याआधी त्यांनी मोदी सरकारवर यावरून सातत्याने टीका केली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे. जनकल्याणाच्या योजनांमुळे इंधनाचे भाव वाढत असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे. मात्र आता एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचे नवे कारण सांगितले आहे.

शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी जन्म प्रमाणपत्रावर दुसऱ्या शाळेत प्रवेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या