30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयलसीकरण प्रकियेत पारदर्शकता आणा; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पंतप्रधानांना ५...

लसीकरण प्रकियेत पारदर्शकता आणा; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पंतप्रधानांना ५ सल्ले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला असून, लसीकरणाच्या प्रक्रियेत पारदर्शता आणून ते सार्वजनिक करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या ५ सल्यात केली आहे़ यात असेही म्हणण्यात आले आहे की, ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लस देण्यास सुरुवात करावी. मनमोहन सिंग म्हणाले की, कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचे आहे. किती लोकांना लस दिली यापेक्षा एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना लस दिली हे जास्त महत्त्वाचे आहे.

पुढील सहा महिन्यात राज्यांना कशापद्धतीने लस पुरवठा करणाचा पुरवठा होईल, याबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे. सरकारला सांगावे लागेल की, वेगवेगळ्या लस उत्पादक कंपन्यांना किती ऑर्डर देण्यात आली आहे. शिवाय अधिक लोकांना लस द्यायची असेल, तर त्यासाठी अडवान्समध्ये ऑर्डर द्यायला हवी, जेणेकरुन ऑर्डर वेळेत मिळेल, असे सिंग म्हणाले आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पुन्हा जनजीवन कसे सुरळित होईल, असे लोकांना वाटू लागले आहे. महामारीवर मात करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, पण लोकांचे लसीकरण होणे सर्वात महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

मनमोहन सिंग यांचे ५ सल्ले
– कोरोना काळात सरकार किती लसी कंपन्यांकडून घेत आहेत, ते सार्वजनिक करावे. कोणत्या कंपनीकडून किती लस घेण्यात आल्या, तसेच कोणत्या कंपनीला किती लसींची ऑर्डर दिली हे लोकांना माहिती असावे.
– कोणत्या राज्याला किती लसी मिळाल्यात, याबाबत एक पारदर्शक फॉर्म्युला असावा
– ४५ वर्षांपेक्षा कमी वय असणा-या फ्रंट लाईन वर्कर्संनाही लस देण्यात यावी. यासाठी वयाची मर्यादा असू नये. शिक्षण, चालक, पंचायत कर्मचारी, वकील या सर्वांना लस देण्यात यावी.
– लस निर्मात्या कंपन्यांना उत्पादनासाठी मदत व्हावी यासाठी पंतप्रधानांनी फंड द्यावे, तसेच इतर सवलती द्याव्यात.
– कोरोना लस निर्मितीसाठी लागणारे लायसन्स काही काळासाठी स्थगित करावे, जेणेकरुन अन्य कंपन्याही लसीची निर्मिती करु शकतील.

टाटा स्टील ३०० टन ऑक्सिजन पुरविणार; केंद्र सरकारच्या मदतीला टाटा स्टील धावले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या