23.1 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयपाकिस्तानच्या गोळीबारात ‘बीएसएफ’ उपनिरीक्षक शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात ‘बीएसएफ’ उपनिरीक्षक शहीद

एकमत ऑनलाईन

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात मंगळवारी सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) एक उपनिरीक्षक शहीद झाला, असे अधिकाºयांनी सांगितले.

मंगळवारी बीएसएफ रायझिंग डे साजरा करीत असतानाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर राजौरी क्षेत्रात पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक पी. ग्युइट हे शहीद झाले. मात्र ग्युइट यांनी मोठे शौर्य दाखवित सहकाºयांचे प्राण वाचविले. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कराचे चार जवान, बीएसएफ अधिकाºयांसह ११ जण शहीद झाले. तसेच चार नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

ट्रायडंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादीचे निदर्शने

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या