23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयवळूने केला लोकल ट्रेनने प्रवास

वळूने केला लोकल ट्रेनने प्रवास

एकमत ऑनलाईन

रांची : लोकल ट्रेन ही प्रवासाचे उत्तम साधन आहे. अनेकजण लोकल ट्रेनने प्रवास करतात पण लोकल ट्रेनने चक्क वळू प्रवास करत असेल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण हे खरंय. या वळूने १५ किमी प्रवास केला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ झारखंडचा आहे. लोकल ट्रेनमध्ये वळूला पाहून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. एका प्रवाशाने याबाबत सांगितले की, एका टोळीने वळूला ट्रेनमध्ये आणले आणि एका खांबाला बांधले, आणि इतर प्रवाशांना पुढच्या स्टेशनवर वळूला उतरवण्यास सांगितले होते. संतप्त प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ बनवला तो प्रचंड व्हायरल होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या