26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयबलात्कारी बस चालकाच्या घरावर बुलडोझर

बलात्कारी बस चालकाच्या घरावर बुलडोझर

एकमत ऑनलाईन

भोपाळ : भोपाळमधील रातीबाद पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या एका नामांकित खासगी शाळेतील नर्सरीच्या विद्यार्थिनीसोबत स्कूल बसमध्ये बलात्कार झाल्याने खळबळ उडाली होती. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर चालक आणि महिला मदतनीस दोघांनाही अटक करण्यात आली.

रातीबाद पोलिस ठाण्यात आरोपी चालक आणि एका महिलेविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर बसचालकाच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आला. महसूल विभाग, पोलिस आणि महानगर पालिकेने संयुक्तरित्या ही कारवाई केली. मंगळवारी हे प्रकरण उघडकीला आले होते. या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी शाळेत तक्रार केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या