29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयसर्व निवडणुक सभा रद्द; राहुल गांधींचा निर्णय

सर्व निवडणुक सभा रद्द; राहुल गांधींचा निर्णय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर वाढत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्त सध्या जोरदार प्रचार सुरु असताना राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राहुल गांधी यांनी ट्विट करत आपला निर्णय जाहीर केला आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींनी वारंवार भाजप नेत्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करुन सभा घेण्यावरुन टीकास्र सोडले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्यात आली होती. मात्र यावेळी काँग्रेसचे नेतेही सभा घेत होते. दरम्यान राहुल गांधी यांनी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर काँग्रेस नेत्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमध्ये कोरोना काळातही विधानसभा निवडणुकांचा प्रचारही धूमधडाक्यात सुरू आहे. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये गेल्या २४ तासांत सहा हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली. तिथे आणखी तीन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. त्यामुळे या रणधुमाळीनंतर राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची भीती आहे.

कारगिलपेक्षा मोठ्या युद्धावर लक्ष कधी देणार?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या