31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयप्रजासत्ताक दिनाचा सोहळाच रद्द करा

प्रजासत्ताक दिनाचा सोहळाच रद्द करा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हजेरी लावणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी केंद्रसरकारला एक आगंतुक सल्ला दिला आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाला मुख्य पाहुणेच नसल्याच्या या परिस्थितीत प्रजासत्ताक दिनाचा सोहळाच रद्द का करू नये? असा प्रश्न थरुर यांनी एक ट्विट करीत विचारला आहे.

प्रजासत्ताक दिनासाठी यंदा भारताने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण दिले होते. मात्र ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे निर्माण झालेला महामारीचा कहर पाहता आपण उपस्थित राहु शकत नसल्याचा निरोप जॉन्सन यांनी दिला आहे. त्यापार्श्वभुमीवर खासदार शशी थरुर यांनी हा आगंतुक सल्ला दिला आहे. प्रजासत्ताक दिनाला पाहुणेच नसतील तर हा सोहळाच का रद्द करु नये असा प्रश्न त्यांनी केंद्रसरकारला विचारला आहे. प्रजासत्ताक दिनाला नेहमीप्रमाणे संचलन पाहण्यासाठी गर्दी जमा करणे हा एक बेजबाबदारपणा ठरू शकतो, असे स्पष्टीकरणही थरूर यांनी दिले आहे.

साध्या पद्धतीने होणार प्रजासत्ताक दिन सोहळा
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा प्रजासत्ताक दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यंदा राजधानी दिल्लीत होणाºया संचलनासाठी कोणत्याही परदेशी व्यक्तीला मुख्य पाहुणा म्हणून आमंत्रित केले जाणार नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द झाल्यानंतर सरकारकडून या कार्यक्रमासाठी कोणत्याही नव्या व्यक्तीला आमंत्रण दिलेले नाही.

कोरोना मृत्यूंच्या संख्येत भारत तिस-या स्थानावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या