26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीय१८ जातींची एससीमध्ये समावेशाची सूचना रद्द

१८ जातींची एससीमध्ये समावेशाची सूचना रद्द

एकमत ऑनलाईन

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश
अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ओबीसीच्या १८ जातींचा समावेश एससी कॅटेगरीमध्ये करण्याच्या सूचनेला रद्द करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार समाजवादी पार्टी आणि योगी सरकारच्यादरम्यान या १८ जातींचा समावेश ओबीसीमधून एससीमध्ये करण्याबाबत सूचना आली होता.

उच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०१७ मध्ये या जातींचे प्रमानपत्र देण्यावर बंदी घातली आहे. या जातीमध्ये मझवार, कहार, कश्यप, केवट, मल्लाह, निषाद, कुम्हार, प्रजापती, धीवर, बिंद, भर, राजभार, धिमान, बाथम, तुरहा गोडिया, मांझी आणि मछुजा यांचा होता. दरम्यान, याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना कोणत्याही जातीचा एससी, ओबीसीत समावेश करण्याचा अधिकार फक्त देशाच्या संसदेला आहे, असे म्हटले होते.

अखिलेश सरकारने शेवटच्या दिवसांत २२ डिसेंबर २०१६ रोजी १८ जातींना अनुसूचित जातींत समाविष्ट करण्याची अधिसूचना जारी केली होती. जिल्ह्यातील सर्व डीएमना आदेश जारी केला होता की, या जातीतील सर्व लोकांना ओबीसीऐवजी एससी प्रमाणपत्र देण्यात यावे.

नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने २४ जानेवारी २०१७ ला या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर २४ जानेवारी २०१९ मध्ये योगी सरकारने पुन्हा दुसरी सूचना जारी केली होती. आता ही अधिसूचनाही रद्द केली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या