21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयतत्कालीन कृषिमंत्र्यांची दुरुस्ती रद्दबादल

तत्कालीन कृषिमंत्र्यांची दुरुस्ती रद्दबादल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील सहकारी संस्थांच्या बाबतीत राज्य विधिमंडळांचे अधिकार मर्यादित करणारी घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना म्हणजेच २०११ मध्ये ही ९७वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. यानुसार, राज्यातील सहकार संस्थांविषयी नियम किंवा निर्णय घेण्याच्या राज्य विधिमंडळांच्या अधिकारांवर मोठ्या प्रमाणावर बंधनं घालण्यात आली होती. मात्र, घटनेच्या राज्य सूचीमध्ये कोणताही बदल करण्यासाठी देशातील किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळांची त्यासाठी परवानगी आवश्यक असते, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने ९७व्या घटनादुरुस्तीचा ९बी हा हिस्सा रद्दबातल ठरवला आहे.

यासंदर्भात गुजरात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन, न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. आऱ गवई यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी पूर्ण खंडपीठाने ९७व्या घटना दुरुस्तीचा ९बी हा भाग फक्त रद्द ठरवला असताना न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी पूर्ण ९७वी घटनादुरुस्तीच रद्द करण्याविषयी आपला निर्णय दिला आहे.

काय होता ९७व्या घटनादुरुस्तीचा ९बी भाग?
गुजरात उच्च न्यायालयाने ९७ व्या घटनादुरुस्तीच्या ९बी या भागामध्ये नमूद असलेल्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर आक्षेप नोंदवला होता. या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थांसंदर्भात कायदे किंवा नियम बनवण्याच्या अधिकारांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध आणले गेले. यात सहकारी संस्थांवर नेमण्यात येणाºया संचालकांची संख्या २१ पर्यंत मर्यादित करणे, बोर्ड सदस्य आणि पदाधिकाºयांची कार्यकाळ मुदत ५ वर्षांपर्यंत करणे, निवडणुका घेण्यासंदर्भातील नियम, किती काळानंतर आॅडिट करायला हवे त्यासंदर्भातील नियम हे घटनादुरुस्तीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले. यासोबतच, सहकारी संस्थांच्या संदर्भात कोणत्या बाबी गुन्हा ठरू शकतील, हे देखील निश्चित करण्यात आले. एकंदरीत ९बी मध्ये राज्य विधिमंडळांवर अनेक बाबींत (सहकार संस्था) निर्बंध घालण्यात आले.

मणिपुरात काँग्रेसमध्ये फुट?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या