21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयकॅन्सर-मधुमेहवरील औषधे ७० टक्क्यांपर्यंत होणार स्वस्त!

कॅन्सर-मधुमेहवरील औषधे ७० टक्क्यांपर्यंत होणार स्वस्त!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकारांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी आवश्यक औषधांच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केंद्र सरकार करू शकते. यासाठी सरकारने काही प्रस्तावही तयार केले आहेत. मात्र, घोषणेबाबत अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

अधिका-यांनी सांगितले की, केंद्राला काही महत्त्वाच्या औषधांच्या चढ्या किमतींबद्दल चिंता आहे आणि ते नियंत्रित करण्यासाठी उत्सुक आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर किमती ७० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी देखील काम करत आहे. केंद्र सरकार दीर्घ कालावधीसाठी वापरल्या जार्णा­या औषधांवर उच्च-व्यापार मार्जिन मर्यादित करण्याचा विचार करत आहे. अंतिम प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी २६ जुलै रोजी फार्मा उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही औषधांवरील व्यापार मार्जिन १००० टक्के पेक्षा जास्त आहे.

एनपीपीए सध्या ३५५ पेक्षा जास्त औषधांच्या किमती मर्यादित करते, जे एनपीपीए अत्यावश्यक औषधांचा भाग आहेत. औषधांवरील व्यापार मार्जिन घाऊक विक्रेत्यांसाठी ८ टक्के आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी १६ टक्केवर देखील नियंत्रित केले जाते. या औषधांच्या सर्व उत्पादकांना त्यांचे उत्पादन जास्तीत-जास्त किमतीत किंवा त्याहून कमीकिंमतीला विकावे लागते. अशा औषधांची किंमत केवळ १० टक्के वाढवू शकतात. अनेकदा अशा औषधांवरील व्यापार मार्जिन खूप जास्त असते आणि त्याचा रुग्णांवर परिणाम होतो. प्रायोगिक तत्त्वावर ४१ कर्करोगविरोधी औषधांचे व्यापार मार्जिन ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित केले. यामुळे या औषधांच्या ५२६ ब्रँडच्या एमआरपीमध्ये ९० टक्के घट झाली आहे. त्यामुळे लवकरच सरकार औषधे स्वस्त करण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या