नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, बीबी.१.५ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण गुजरातमध्ये आढळून आला आहे. हे ओमिक्रॉनचा म्यूटेशन आहे. अमेरिकेत हा म्यूटेशन अति वेगाने पसरत आहे. अजूनही ४०% पेक्षा जास्त प्रकरणे भारतात आहेत. गेल्या आठवड्यात हा आकडा १८% होता. बीए.२.७५ आणि बीजे.१ एकत्र मिळून बीबी बनला जातो. आता यातून बीबी.१ आणि बीबी.१.५ चे म्यूटेशन निर्माण झाले आहे.
दरम्यान, अमेरिकेतून परतलेल्या एका ३८ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. ही महिला मध्यप्रदेशातील जबलपूरची रहिवासी आहे. सद्या तिच्यावर विलगीकरणात उपचार सुरू आहेत. महिलेला बीएफ.७ प्रकाराने संसर्ग झाला की नाही, हे निर्धारित करण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग तपासणीसाठी महिलेचा नमुना घेण्यात आला आहे. २३ डिसेंबर रोजी पती आणि मुलीसह ती अमेरिकेतून परतली होती. दुसरीकडे, टोरंटो विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे समोर आले की, कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असतो. विशेषत: ज्या रुग्णांना अँटी-सीडी २० दिली जात आहे. कॅनडातील हा अभ्यास अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशीत झाला आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
महाराष्ट्र: १८ नवीन रुग्ण आढळले, १४ लोक बरे झाले
शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे १८ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर येथील लोकांचा समावेश आहे. त्याचबरोबर गेल्या २४ तासात १४ जण कोरोनापासून बरे झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क
राजस्थान सरकारसोबतच डुंगरपूर जिल्ह्यातील आरोग्य विभागही कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर सतर्क आहे. यासाठी १५० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच ३८ खाटांचे आयसीयू आणि ५३ व्हेंटिलेटरही तयार करण्यात आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. महेंद्र डामोर म्हणाले की, मास्क, पीपी किट आणि इतर डिस्पोजेबल साहित्य बचावासाठी तयार आहे.