21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयभीक मागणा-यांना रोखू शकत नाही

भीक मागणा-यांना रोखू शकत नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी भिका-यांना ट्राफिकमध्ये, सार्वजनिक ठिकाणी आणि बाजारपेठांमध्ये भीक मागण्यापासून रोखण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने भिका-यांना भीक मागण्यास मज्जाव करू शकत नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, भीक मागणे हा एक सामाजिक आणि आर्थिक मुद्दा आहे आणि गरीबी लोकांना भीक मागण्यासाठी भाग पाडते. असे वक्तव्य करत सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर विचार करण्यास नकार दिला आहे. ज्यामध्ये कोरोना संकटादरम्यान सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर भीक मागण्यावर बंदी घालण्याची मागणी केली गेली होती.

जस्टीस धनंजय वाय चंद्रचूड आणि जस्टीस एम़आऱ शाह यांच्या न्यायपीठाने कुश कालरा यांच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. पीठाने म्हटले की, ते भीक मागण्यावर बंदी घालण्याची मागणी करणा-या याचिकेवर विचार करु शकत नाहीत. न्यायपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकीलांना प्रतिप्रश्न केला की सरतेशेवटी लोक भीक का मागतात? गरीबीमुळे लोक भीक मागण्यासाठी भाग पडतात.

गरीबी भीक मागायला भाग पाडते
सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, जेव्हा गरीबी एखाद्याला भीक मागण्यास भाग पाडते तेव्हा तो उच्चभ्रू दृष्टिकोन स्वीकारणार नाही. कुणालाही भीक मागण्यास आवडत नाही. गरीबी त्यांना भीक मागायला भाग पाडते. ही एक सामाजिक-आर्थिक समस्या आहे. हा सरकारची आर्थिक आणि सामाजिक धोरणांचा भाग आहे. आपण असे म्हणू शकत नाही की भिकारी आपल्या डोळ्यांसमोरुन दूर व्हावेत.

काँग्रेस संसदेचे कामकाज सुरळीत होऊ देत नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या