26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयअशा अवस्थेत कामच करू शकत नाही

अशा अवस्थेत कामच करू शकत नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या समोरच आम्ही या परिस्थितीत काम करू शकत नसल्याचे सुनावले. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या एका इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतात न्यायालयांसाठी पायाभूत सुविधा हा कायम नंतर विचार करावा असा विषय राहिला, असे मत रमणा यांनी व्यक्त केले. न्यायालये जीर्ण ठिकाणी काम करतात या मानसिकतेमुळे असे होते. यामुळे न्यायालयांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, असेही त्यांनी नमूद केले.

सरन्यायाधीश रमण म्हणाले, केवळ ५ टक्के न्यायालयाच्या इमारतीत प्राथमिक उपचाराची व्यवस्था आहे आणि २६ टक्के न्यायालयात अजूनही महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहं नाहीत. १६ टक्के न्यायालयात तर पुरूषांसाठी देखील स्वच्छतागृह नाहीत. जवळपास ५० टक्के न्यायालयांमध्ये ग्रंथालय नाही. ४६ टक्के न्यायालयात पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था नाही.

परिणामकारक कामाची अपेक्षा असेल तर अशा परिस्थितीत काम करू शकत नाही. रमण यांनी किरेन रिजिजू यांच्या समोरच न्यायालयीन व्यवस्थेकडून तुम्हाला परिणामकारक कामाची अपेक्षा असेल तर आम्ही अशा परिस्थितीत काम करूच शकत नाही, असे सुनावले. ते म्हणाले, मी केंद्रीय कायदा मंत्र्यांना न्यायालयांच्या पायाभूत सुविधांबाबत प्रस्ताव पाठवला आहे. मी त्यावर लवकरच सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करतो. तसेच कायदा मंत्री याच्या प्रक्रियेला गती देतील, अशी आशा आहे.

न्यायव्यवस्थेतील विश्वास लोकशाहीची ताकद
अनेकवेळा नागरिक न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी येत नाहीत. मात्र, आता त्यासाठी काम करण्याची वेळ आहे. लोकांचा न्यायव्यवस्थेतील विश्वास ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असेही मत रमण यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या