28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयकॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष सोमवारी भाजपमध्ये विलीन होणार

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष सोमवारी भाजपमध्ये विलीन होणार

एकमत ऑनलाईन

चंदिगढ : पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असून कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानंतर दोन दिवसांनी म्हणजे सोमवार दि. १९ सप्टेंबर रोजी कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत.

राजधानी नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यादरम्यान त्यांच्यासोबत पंजाबचे ६ ते ७ माजी आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. कॅप्टनसोबत भाजपमध्ये प्रवेश करणा-या नेत्यांमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रण इंदर सिंग, मुलगी जय इंदर कौर आणि नातू निर्वाण सिंग यांचा समावेश आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रणीत कौर अजूनही काँग्रेस पक्षात आहेत. त्या पंजाबमधील पटियालातील काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी नवज्योतसिंग सिध्दू यांच्याशी झालेल्या हाय-प्रोफाइल वादामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात निवडणूक लढवली. या सर्व वादानंतरही कॅप्टनच्या पत्नीने काँग्रेस पक्ष सोडला नाही. मात्र, त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्याची मागणी सातत्याने होत आहे.

कॅप्टनच्या पक्षाने ३७ जागांवर निवडणूक लढवली
पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टनच्या पंजाब लोक काँग्रेसने ३७ जागा लढवल्या, तर मित्रपक्ष भाजपने ६५ जागांवर नशीब आजमावले. या विधानसभा निवडणुकीत कॅप्टनच्या पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. स्वत: कॅप्टन अमरिंदर सिंग हे त्यांच्या बालेकिल्ल्यात आम आदमी पक्षाच्या उमेदवाराकडून मोठ्या फरकाने पराभूत झाले. पंजाब निवडणुकीत भाजपला फक्त २ जागा मिळाल्या. मात्र, निवडणुकीनंतर पंजाबमधील काँग्रेस पक्षाचे नेते सातत्याने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आता या नेत्यांमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाचाही समावेश होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या