28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयप्रशांत भूषण यांच्यावरील खटला बंद

प्रशांत भूषण यांच्यावरील खटला बंद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांना आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण यांच्याविरोधात दाखल केलेला अवमान खटला बंद केलाय.
२००९ मध्ये तहलका मासिकाला दिलेल्या मुलाखतीनंतर प्रशांत भूषण आणि पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर अवमानाचा खटला सुरू होता, तो आता बंद करण्यात आलाय. भारताचे 16 माजी सरन्यायाधीश भ्रष्ट असल्याचं प्रशांत भूषण यांनी म्हटलं होतं.

न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी प्रशांत भूषण यांची बाजू मांडणारे अधिवक्ता कपिल सिब्बल म्हणाले, या प्रकरणी माफी मागितली आहे. यानंतर न्यायमूर्तींच्या खंडपीठानं सांगितलं की, ज्या लोकांनी अवमान केला आहे त्यांनी दिलेली माफी लक्षात घेता, आम्ही अवमानाची कारवाई पुढं जाणं आवश्यक मानत नाही. ही अवमानाची कारवाई बंद केली जाते, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय.

काय आहे नेमकं प्रकरण
नोव्हेंबर 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण आणि तरुण तेजपाल यांच्या विरोधात अवमानाच्या नोटिसा जारी केल्या. दोघांवर ‘तहलका’ या वृत्तपत्रिकेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान काही विद्यमान न्यायाधीश आणि माजी न्यायाधीशांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. तरुण तेजपाल त्यावेळी या मासिकाचे संपादक होते. २००९ च्या या अवमान प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रशांत भूषण म्हणाले होते की, भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या न्यायाधीशांवर अवमानाची कारवाई होऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याविरुध्द याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा आज निकाल लागला असून प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या