26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयउघड्यावर नमाज अदा केल्याप्रकरणी २५ जणांविरुद्ध दाखल गुन्हे पोलिसांकडून रद्द

उघड्यावर नमाज अदा केल्याप्रकरणी २५ जणांविरुद्ध दाखल गुन्हे पोलिसांकडून रद्द

एकमत ऑनलाईन

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील छजलत भागातील दुल्लेपूर गावात उघड्यावर नमाज पठण केल्याप्रकरणी २५ जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा पोलिसांनी रद्द केला आहे.

मुरादाबाद पोलिसांनी मंगळवारी ट्विटरवरून ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, “दुल्लेपूर गावात फिर्यादी चंदरपाल इत्यादींनी सामूहिक नमाज पठण केल्याबद्दल छजलाईत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता, तपासाअंती ही घटना सत्य असल्याचे आढळले नाही. याच ट्विटमध्ये पुढे म्हटले की, दाखळ गुन्हे रद्द करण्यात आले असून उर्वरित कायदेशीर कार्यवाही पार पाडली जाईल.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) संदीप कुमार मीना यांनी सांगितले की, २४ ऑगस्ट रोजी दुल्लेपूर गावातील एका घरात काही लोक नमाज अदा करत होते. त्यांनी सांगितले की, घरात जागा नसल्यामुळे काही लोक उघड्यावर नमाज अदा करण्यासाठी येतात, तर पूर्वी त्यांना असे न करण्याचा इशारा देण्यात आला होता. मीना यांनी सांगितले की, काही गावकऱ्यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी २५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र एकाही व्यक्तीला अटक करण्यात आली नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या