24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeराष्ट्रीयबिहारमधील ७२ टक्के मंत्र्यावर गुन्हे दाखल

बिहारमधील ७२ टक्के मंत्र्यावर गुन्हे दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बिहारमधील नव्याने स्थापन झालेल्या ७० टक्क्यांहून अधिक मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत असे निवडणूक अधिकार मंडळ एडीआरने म्हटले आहे. या शिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत.

बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी अलीकडेच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आरजेडीसोबत हातमिळवणी करणा-या नितीश कुमार यांनी मंगळवारी ३१ नवीन मंर्त्यांचा समावेश करून आपल्या नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार केला. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी १० ऑगस्ट रोजी शपथ घेतली होती. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि बिहार इलेक्शन वॉचने २०२० च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या मुख्यमंत्र्यांसह ३३ पैकी ३२ मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे.

एक कॅबिनेट मंत्री आणि जदयूचे अशोक चौधरी, जे विधान परिषदेचे नामनिर्देशित सदस्य आहेत, त्यांना त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाहीत. त्यामुले त्यांची गुन्हेगारी, आर्थिक आणि इतर तपशीलांची, अऊफ मध्ये उपलब्ध नाही असे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, २३ मंत्र्यांनी (७२ टक्के) फौजदारी खटले दाखल असल्याचे घोषित केले आहे. तर १७ मंत्र्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या