मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच निवासस्थान असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्रभुकुंज सोसायटीत गेल्या आठवड्यात पाच करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने लता मंगेशकर यांची इमारत सील केली आहे. या इमारतीत वृद्ध लोक आधिक प्रमाणात राहत असल्यामुळे बीएमसीनं खबरदारी म्हणून शनिवारी रात्री ही इमारात सील केली आहे.
प्रभुकुंज सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर वास्तव्यास आहेत. याशिवाय सोसायटीत काही वयस्कर रहिवासीदेखील राहतात. बीएमसीकडून ही संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज करण्यात येणार आहे. त्याशिवाय सोसायटी परिसरात औषध फवारणीही केली जाणार आहे.
मंगेशकर कुटुंबियांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली. यामध्ये त्यांनी लिहलेय, ‘आम्हाला आज संध्याकाळपासून प्रभुकुंज सोसायटी सील करण्याबाबत फोन येत आहेत. सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. वयोवृद्ध रहिवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड सतर्क राहणं गरजेचं आहे.’
हिरवा सिग्नल मिळताच कोरोना प्रतिबंधक लस कमी वेळात मिळेल