26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशभरात ३३ ठिकाणांवर सीबीआयचे छापे

देशभरात ३३ ठिकाणांवर सीबीआयचे छापे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर पोलिस भरती घोटाळ्यासंदर्भात देशभरात ३३ ठिकाणी सीबीआयची छापेमारी सुरू आहे. ही छापेमारी जे अ‍ॅन्ड के एसएसबीचे अध्यक्ष खालिद जहांगीर आणि कंट्रोलर अशोक कुमार यांच्यासह इतर काही जणांच्या ठिकाणांवर सुरू आहे. जम्मूमध्ये १४, श्रीनगरमध्ये १, हरियाणात १३ आणि गुजरातमधील गाझियाबाद, बेंगळुरू आणि गांधीधाममध्ये प्रत्येकी एका ठिकाणावर ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आगे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिस, डीएसपी आणि सीआरपीएफच्या अधिका-यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात येत आहेत.

हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा एड्युमॅक्स कोचिंगचे बहुतेक उमेदवार उपनिरीक्षक भरतीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. जम्मू आणि काश्मीर उपनिरीक्षक भरतीची परीक्षा २७ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती. ज्यामध्ये ९७००० उमेदवारांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर या भरती परीक्षेचा निकाल ४ जून २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये १२०० उमेदवार उत्तीर्ण झाले. मात्र, परीक्षेत हेराफेरीच्या तक्रारींनंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली.

गेल्या महिन्यातही करण्यात आली होती छापेमारी
सीबीआयने गेल्या महिन्यात ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर सब इन्स्पेक्टर भरती घोटाळ्यात ३० ठिकाणी छापे टाकले होते. ५ ऑगस्ट रोजी जम्मूमधील २८, श्रीनगर आणि बंगळुरूमधील प्रत्येकी एका ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने जम्मू-काश्मीर उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणी आतापर्यंत ३३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या