27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeराष्ट्रीयकार्ती चिदंरबरम यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

कार्ती चिदंरबरम यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

एकमत ऑनलाईन

चेन्नई : काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांच्या निवासस्थानी केंद्रीय अन्वेशन ब्युरोने अर्थात सीबीआयने छापेमारी केल्याचे वृत्त आहे. चेन्नई येथील त्यांच्या घरी सीबीआयचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे ते पुत्र आहेत.

यापूर्वीही कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित ९ ठिकाणांवर सीबीआयने धाडी टाकल्या होत्या. २५० चिनी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मे महिन्यात याच प्रकरणी ईडीनेही कार्ती चिदंबरम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

चिदंबरम यांच्या महत्वाच्या ९ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय भास्कर रमण यांना व्हिसा भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. दरम्यान, यापूर्वीही लाखो रुपये घेऊन व्हिसा तयार करण्याच्या प्रकरणात सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित मालमत्तांवर कारवाई केली होती. कार्ती चिदंबरम यांनी चिनी कंपन्यांमधील लोकांना आपली खास ओळख वापरुन व्हिसा दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या