नवी दिल्ली : ‘सीबीएसई’ निकालासंदर्भात ४ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र आता हा निकाल लांबविण्यात आला आहे. दहावी सीबीएसई टर्म-२ चा निकाल हा येत्या १३ जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे, तर बारावी सीबीएसई टर्म-२ चा निकाल १५ जुलैला जाहीर होणार, अशी माहिती समोर आली आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत सुचना देण्यात आलेली नाही. अधिकृत वेबसाइट ूु२ी.ॅङ्म५.्रल्ल, १ी२४’३२.ॅङ्म५.्रल्ल. आणि ूु१ी२४’३२.ल्ल्रू.्रल्ल वरुन निकाल जाहीर करण्यात येईल याशिवाय विद्यार्थी परिक्षा संगम या टॅब वरुनही गुणपत्रिका डाऊललोड करु शकतील.