34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारत आणि पाकमध्ये युद्धविराम करार

भारत आणि पाकमध्ये युद्धविराम करार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत महत्वाचा करार झाला असून दोन्ही देशाच्या लष्करांनी जम्मू आणि काश्मीरमधील तसेच, इतर परिसरातील नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबवण्यावर सहमती झाल्याची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टर जनरलकडून यासंबंधी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. दोन्ही देशांकडून २००३ मध्ये झालेल्या युद्धविरामाच्या कराराचे पालन केले जाणार आहे. या करारामुळे भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेला तणाव कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, दोन्ही अधिकारी टेलिफोन हॉटलाइनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी कोणताही गैरसमज दूर करण्यासाठी तसेच, तोडगा काढण्यासाठी फ्लॅग मीटिंग किंवा हॉटलाइन सुविधा यंत्रणेचा उपयोग करण्याबाबत दोन्ही बाजूंनी एकमत झाल्याचे लष्कराने सांगितले आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टर जनरलमध्ये हॉटलाइनच्या मार्फत चर्चा पार पडली. दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेवरील तसंच इतर ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. दोन्ही देशाच्या अधिका-यांनी शांतता भंग करत हिंसारास बळ देणा-या महत्वाच्या मुद्द्यांवर शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यावरही एकमत दर्शवले आहे.

करारांचे पालन करण्याची सहमती
दोन्ही बाजूंनी नियंत्रण रेषा आणि इतर सर्व क्षेत्रातील करारांचे पालन करण्यावर तसेच, समजूतदारपण दर्शवण्यावर आणि गोळीबार थांबविण्यास सहमती दर्शवली आहे. २४/२५ फेब्रुवारी २०२१ रोजी मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

शांती निर्माण होण्याची शक्यता
एलओसीवर देखील शांती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतू पाकिस्तानवर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी नेहमी विश्वासघात केला आहे. एकीकडे भारतावर घुसखोरी करण्याचे आरोप करायचे आणि दुसरीकडे सीमेपलिकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करायचे असा दुटप्पीपणा पाकिस्तान करत आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या