22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयहैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा करा

हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा करा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. हा दिवस आता मराठवाडा, तेलंगाणा, कर्नाटकातील विद्यापीठांमध्ये सुद्धा साजरा केला जावा, या संदर्भातील सूचना विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने संबंधित विद्यापीठांना, महाविद्यालयांना काल (१३ सप्टेंबर) दिल्या आहे.

यूजीसीचे अध्यक्ष ए जगदीश कुमार यांनी तेलंगाणा राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंना आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आणि मराठवाडा आणि कर्नाटकातील जिल्ह्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेवर राष्ट्रध्वज फडकवण्याची विनंती केली आहे. या भागातील विद्यापीठ महाविद्यालय १७ सप्टेंबरच्या सकाळी प्रभात फेरी देखील काढू शकतात. या दिवशी उपक्रमांच्या सूचक यादीमध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम संदर्भात प्रतिष्ठित लोकांचे भाषण, पथनाट्य, प्रदर्शन, सोशल मीडिया जागृती मोहीम, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा इत्यादींचा समावेश असावा असे यूजीसीकडून सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या