25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयकुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करा

कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचा उद्रेक सुरु असताना हरिद्वारमध्ये सगळे नियम धाब्यावर बसवत कुंभमेळ्याचे आयोजन सुरु आहे. शनिवार दि़ १७ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. दरम्यान, सतत वाढणा-या रुग्णसंख्येवरून पाहिले तर पंतप्रधानांच्या या आवाहनाला बराच उशीर झाल्याचे दिसत आहे.

कोरोनाचा उद्रेक होत असतानाही प्रचंड गर्दीत साजरा होणा-या कुंभमेळ्यावर अखेर पंतप्रधान बोलले. कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करा, असे आवाहन मोदींनी केले आहे़ कुंभमेळ्याच्या आयोजनातले एक महत्वाचे संत आचार्य महामंडलेश्वर यांच्याशी पंतप्रधानांनी सकाळी फोनवरून चर्चाही केली. त्यावर अवेधाशनंद गिरी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. कुंभमेळ्यात लोकांनी गर्दी करू नये असे आवाहन त्यांनी केले.

कुंभमेळा संपणार नाही तर प्रतिकात्मक पद्धतीने साजरा होईल, असे ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या तीन शाही स्रानांपैकी दोन संपन्न झालेत. तिसरे आणि शेवटचे शाहीस्रान २७ एप्रिलला होणार आहे. ३० एप्रिलला कुंभमेळ्याची समाप्ती होणार आहे. पण आत्तापर्यंत जवळपास ५० लाख लोकांनी या स्रानासाठी हजेरी लावून झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाला जरा उशीर झाला, असेच म्हणावे लागेल.

दीप सिद्धूला सशर्त जामीन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या