24.4 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeराष्ट्रीयकेंद्र सरकारने दिला इशारा : हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार; सण मास्क घालूनच...

केंद्र सरकारने दिला इशारा : हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार; सण मास्क घालूनच करा साजरे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात सध्या 61 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यात आता लॉकडाऊन हळूहळू शिथील केला जातो आहे. हिवाळा (winter) तोंडावर आहे आणि एक ना दोन कित्येक सण आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यात अधिक सावध राहण्याची गरज आहे. हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार आहे, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे आणि त्यामुळे सर्व सण मास्क घालूनच साजरे करा असा सल्लाही दिला आहे.

हिवाळ्याच्या महिन्यांत कोरोना संक्रमण अधिक पसरू शकतो, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. हिवाळा श्वसनसंबंधी आजारांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरससाठी पोषक आहे, त्यामुळेच हिवाळ्यात कोरोना अधिक पसरू शकतो, असं नीती आयोगाचे सदस्य आणि भारताच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के पॉल यांनी सांगितलं.

“कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही महिन्यात आपल्याला मास्कवाली पूजा, मास्कवाली छटपूजा, मास्कवाली दिवाळी, मास्कवाला दसरा, मास्कवाली ईद साजरी करावी लागेल”, असं डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.”आता अनेक सण, उत्सव येणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक एकत्र येण्याची एकमेकांना भेटण्याची संख्या आहे. त्यात हिवाळाही आहे. त्यामुळे राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात”, अशा सूचना आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी दिली आहेत.

लोहा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन

केंद्र सरकारने सकाळी दहा वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाव्हायरस संक्रमितांची संख्या आता 61 लाख 45 हजार 292 झाली आहे. कोरोना संक्रमितांमध्ये 60 लाखांचा आकडा पार करणारा भारत हा जगातला दुसरा देश आहे. भारताआधी अमेरिकेनं हा आकडा पार केला होता.

दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. 24 तासांत देशात 70 हजार 589 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 85 हजार 194 रुग्ण निरोगी झाले. आतापर्यंत 51 लाख 1 हजार 398 रुग्ण रिकव्हर झाले आहेत. सध्या देशात 9 लाख 47 हजार 576 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर 24 तासांत देशात 776 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या आता 96 हजार 318 झाली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या