24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeराष्ट्रीयकेंद्र सरकारची ट्विटरला नोटीस

केंद्र सरकारची ट्विटरला नोटीस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली असून पाच दिवसांत स्पष्टीकरण मागितलं आहे. ट्विटरने नकाशात लेहमधील भाग जम्मू काश्मीरमध्ये दाखवला होता. याप्रकरणी केंद्राकडून ही नोटीस पाठवण्यात आली असून हा भाग केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये का दाखवण्यात आला नाही अशी विचारणा केली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. चुकीचा नकाशा दाखवून भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा अनादर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये? अशी विचारणा मंत्रालयाकडून करण्यात आली असून उत्तर देण्यासाठी पाच दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. ९ नोव्हेंबरला ही नोटीस पाठवण्यात आली. पूर्वीचे जम्मू-काश्मीर राज्य जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजित करण्यात आलं आहे. लेह हा लडाखचा भाग आहे.

राजदची हालचालींवर नजर

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या