28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयरोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केंद्राची नियमावली

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केंद्राची नियमावली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. मे महिन्यात आतापर्यंत तीन दिवस देशात ४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास कोरोनावर लवकर मात करता येते. त्यामुळे कोरोना रुग्णांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यायला हवे. अशा पदार्थांची यादी केंद्र सरकारने माय गव्हर्नमेंट इंडिया या ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे.

रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने काही पदार्थांची यादी शेअर केली आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत काही ठळक लक्षणे दिसून आली आहेत. तोंडाची चव जाणे आणि वास न येणे कोरोनाचे लक्षणे मानले जाते. तोंडाची चवच गेल्याने कोरोना रुग्णांना जेवताना अडचणी येतात. भूक लागत नसल्याने, अन्न गिळताना त्रास होत असल्याने रुग्णांच्या पोटात फारसे काही जात नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. अशा स्थितीत नरम पदार्थ ठराविक अंतराने खाण्याचा, पदार्थांमध्ये आमचूर वापरण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.

कोरोना रुग्णाने कोणता आहार घ्यावा?
– व्हिटामिन आणि मिनरल्स मिळवण्यासाठी फळे आणि भाज्या खाव्यात
– किमान ७० टक्के कोको असलेले डार्क चॉकलेट थोड्या प्रमाणात खावे
– दिवसातून एकदा हळद घातलेले दूध प्यावे
– ठराविक अंतराने नरम पदार्थ खावेत. त्यात आमचूर घालावे.
– नाचणी, ओट्स आणि राजगि-याचे पदार्थ खावेत
– प्रोटिनयुक्त आहार घ्यावा. चिकन, मासे, अंडी, पनीर, सोया, सुकामेवा खावा.
– अक्रोड, बदाम, आॅलिव्ह तेल आणि मोहरीचे तेल उपयुक्त़

कठोर निर्णयास भाग पाडू नका – सर्वोच्च न्यायालय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या