37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयजुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल!

जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल!

एकमत ऑनलाईन

दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीतच १ जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आणि या बदललेल्या नियमांमुळे एटीएम वापरकर्त्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. सरकारने एटीएमचे व्यवहार शुल्क मागे घेतले होते परंतू आता ही सूट आता 30 जून रोजी संपुष्टात येणार आहे.

नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागू नये म्हणून 3 महिन्यांसाठी सरकारने एटीएमचे व्यवहार शुल्क रद्द केले होते. मात्र ही ३ महिन्यांची मुदत 30 जूनला संपणार असून ATM transaction च्या गाईडलाईन्सनुसार, 1 जुलै पासून पूर्वीचे नियम पुन्हा लागू होतील.

या नियमांनुसार, इतर बँकेतून महिन्यातून 5 वेळेस रोख व्यवहार केल्यास तुम्हाला व्यवहार शुल्क भरावं लागेल. त्याचसोबत बँक ग्राहक त्यांच्या एटीएममधून महिन्यातून केवळ 5 वेळाच पैसे काढू शकतात. जर त्यानंतर पैसे काढले तर त्यासाठी शुल्क भरावे लागतील.

बँकांनी एटीएमधून पैसे काढण्यासाठी नियम लावले आहेत. यानुसार, 5 पेक्षा जास्त वेळा जर एटीएममधून पैसे काढले तर 8 ते 20 रूपये भरावे लागतील. याशिवाय इतर बँकेतून तुम्ही केवळ 3 वेळा विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी आहे. त्यानंतर पैसे काढल्यास शुल्क आकारण्यात येईल.

Read More  धक्कादायक प्रकार : ‘त्या’ तीन साधूंनी महिलेवर एकदा नाही तर सलग सातवेळा केला बलात्कार!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या