30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयरेल्वे तिकीटाच्या नियमांत बदल

रेल्वे तिकीटाच्या नियमांत बदल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने शनिवार दि़ १० ऑक्टोबर तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता प्रवाशांसाठी एक खास सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. प्रवशांना आता रेल्वे स्थानकामधून निघण्याच्या पाच मिनिटे अगोदरपर्यंत त्यांचे तिकीट बुक किंवा रद्द करता येणार आहे. १० ऑक्टोबरपासून ज्या विशेष रेल्वे सुरू होत आहेत, त्या सर्व रेल्वेंसाठी हा नियम लागू असणार आहे.

तसेच, आता तिकीट बुकींगचा दुसरा चार्ट रेल्वे स्थानकातून निघण्याच्या ३० मिनिटे अगोदर जाहीर केला जाणार आहे. भारतीय रेल्वेने स्थानकांमधून रेल्वेंच्या ठरलेल्या निघण्याच्या वेळेच्या अर्धातास अगोदर दुसरा बुकींग चार्ट तयार करण्याच्या मागील प्रणालीस शनिवार दि़ १० ऑक्टोबर लागू करण्याच निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत कोरोना महामारीमुळे हा कालावधी रेल्वे निघण्याच्या दोन तास अगोदर असा केला गेला होता.

पूर्वी हाच कालावधी ४ तास अगोदर होता
रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे की, कोविड-१९ च्या अगोदर नियमांनुसार पहिला बुकींग चार्ट रेल्वे स्थानकातून निघण्याच्या ठरलेल्या वेळेच्या किमान चार तास अगोदर तयार केला जात होता. जेणेकरून उपलब्ध असलेल्या जागा दुसरा बुकींग चार्ट तयार होईपर्यंत, अगोदर या अगोदर जागा मिळवा या आधारावर पीआरएस काउंटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून बुक करता येतील.

टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्या सुरू
भारतीय रेल्वेने २५ मार्चपासून देशभरातील लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या होत्या. नंतर त्यांना टप्प्याटप्प्याने सुरू केले गेले. ज्याची सुरूवात १ मे रोजी स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यांमध्ये पोहचवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्यापासून झाली.

लष्कराने पाकचा डाव उधळला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या