नवी दिल्ली : कोरोना काळात परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम असताना काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता सीबीएससी बोर्डाने आपल्या वेळापत्रकात बदल केले आहेत. १० वी आणि १२ वीच्या काही विषयांच्या परीक्षा तारखांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. येणारी १२ वीच्या विद्यार्थ्यांची फिजिक्स विषयाची परीक्षा १३ मे रोजी होणारी होती. मात्र नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा ८ जून रोजी होईल. तसेच, १२ वीच्या गणित विषयाची १ जूनला होणारी परीक्षा ३१ मे रोजी घेण्यात येईल.
१२ वीच्या विद्यार्थ्यांची वेब अॅप्लीकेशनची परीक्षा ३ जून ऐवजी २ जूनला होणार, तर भूगोल विषयाची परीक्षा २ जून ऐवजी ३ जून रोजी होणार. दरम्यान बोर्डाने बदललेले वेळापत्रक सीबीएसई रिवाईज्ड डेट शीट या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. इथे ते पाहू शकाल़आता १० वीच्या गणित विषयाची परीक्षा २१ मेच्या जागी २ जून, फे्रन्चची परीक्षा १३ मे रोजी होणारी परीक्षा आता १२ मे रोजी होणार, विज्ञान विषयाची परीक्षा १५ मे ऐवजी २१ मे तर संस्कृत विषयाची २ जून रोजी होणारी परीक्षा ३ जून रोजी घेण्यात येईल.
भारताने सैन्यांनी संघटित व्हावे – सीडीएस बिपीन रावत