24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयरविवारी चन्नी मंत्रीमंडळाचा शपथविधी

रविवारी चन्नी मंत्रीमंडळाचा शपथविधी

एकमत ऑनलाईन

चंडीगड : पंजाबच्या नव्या मंत्रिमंडळाची नावे निश्­िचत झाली आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पाच निकटवर्तीयांना नारळ दिला आहे. तर आठ मंत्र्यांची वापसी होत आहे. नव्या मंत्रिमंडळात सात नवीन चेहरे आहेत. मुख्यमंत्री चन्नी यांनी राज्यपालाची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी सायंकाळी ४.३० वाजता होणार असल्याचे जाहीर केले.

पंजाबच्या संभाव्य मंत्र्यांची नावे निश्चित झाली आहेत. दिल्लीत नावे अंतिम झाल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी परत सिमल्याकडे रवाना झाले. ते बैठकीसाठी सिमल्याहून दिल्लीला आले होते. मुख्यमंत्री चरणजित चन्नी देखील पंजाबला परतले. त्यानंतर त्यांनी राज्यपाल बी.एल. पुरोहित यांच्याशी चर्चा केली. यानुसार उद्या सायंकाळी ४.३० वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे चन्नी यांनी पत्रकारांना सांगितले. तत्पूर्वी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा आणि ओ.पी. सोनी यांनी शपथ घेतली आहे.

कॅप्टनच्या मंत्रिमंडळातील साधू सिंग धर्मसोत, बलवीर सिद्धू, राणा गुरमीत सोधी, गुरप्रीत कांगड, सुंदरश्­याम अरोरा यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. यात साधू सिंग धर्मसोत यांच्यावर पोस्टमॅट्रिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. राणा सोधी यांनी सिद्धू गटाने बंडखोरी केल्यानंतर कॅप्टनचे शक्तीप्रदर्शन घडवण्यासाठी भोजनाचे आयोजन केले होते. कांगड यांच्यावर जावयाला सरकारी नोकरी दिल्याचा आरोप होत आहे. त्यासाठी सुनील जाखड यांनी दबाव आणला होता. परंतु उपयोग झशला नाही. सुंदर शाम अरोरा देखील कॅप्टनच्या जवळचे असून त्यांच्यावरही जमीनीशी संबंधित आरोप आहेत.

मंत्रिमंडळात कोणाचा समावेश?
पंजाब मंत्रिमंडळात मनप्रीत बादल, विजयेंद्र सिंगला, रझिया सुलताना, ब्रह्म मोंिहदरा, अरुणा चौधरी, भारतभूषण आशू, तृप्त रांिजदर बाजवा आणि सुख सरकारिया यांची वापसी होत आहे. तसेच राजकुमार वेरका, परगतसिंग, संगत गिलजिया, गुरकिरत कोटली, कुलजित नाग्रा, राणा गुरजित आणि अमरिंदरसिंग राजा वडिंग यांचा नव्याने समावेश होत आहे. गुरकिरत कोटली हे लुधियानाचे खासदार रवनीत बिट्टू यांचे चुलत बंधू असून माजी मुख्यमंत्री दिवंगत बिअंतसिंग यांच्या कुटुंबातील आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या