23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांविरोधात आरोपपत्र दाखल

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांविरोधात आरोपपत्र दाखल

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : मनी लाँड्रिंग प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या निधीच्या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ८४ वर्षीय फारुख अब्दुल्ला यांची ईडीने ३१ मे रोजी श्रीनगरमध्ये तीन तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती.

फारुख अब्दुल्ला यांच्यासह अहसान अहमद मिर्झा, मीर मंजूर गझनफर आणि इतरांची नावेही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली असून, पीएमएलए कोर्टाने सर्व आरोपींना पीएमएलएच्या विशेष कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. सर्व आरोपींना २७ ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले आहे.

हे प्रकरण जे अ‍ॅन्ड के क्रिकेट असोसिएशनचे पैसे जेकेसीएच्या पदाधिका-यांसह असंबंधित पक्षांच्या विविध वैयक्तिक बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करणे आणि खङउअ बँक खात्यांमधून रोख पैसे काढण्याशी संबंधित आहे. आतापर्यंत या प्रकरणी फारुख अब्दुल्ला यांची २१.५० कोटी रुपयांची संपत्ती ईडीने यापूर्वीच जप्त केली आहे. सीबीआयने ११.०७.२०१८ रोजी दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने जेकेसीएच्या पदाधिका-यांविरुद्ध मनी लाँंिड्रगची चौकशी सुरू केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या