नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण अनेक राज्यांतून त्यांचे उपक्रम अजूनही सुरू आहेत, त्यांना सातत्याने निधीही मिळत आहे. दरम्यान, पीएफआय २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवू इच्छित असल्याची बातमी आली होती. यासाठी ते मुस्लिम तरुणांची दिशाभूल करत आहे. त्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण देत आहेत. आता याच प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी पीएफआयच्या २ सदस्यांना आरोपी करण्यात आले आहे.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये पीएफआयने मोठा कट रचला होता. त्या कटांतर्गत विविध समाजांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. यासोबतच मुस्लिम तरुणांचे ब्रेनवॉशिंग केले जात होते. त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात होते. हे सर्व करून २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याची तयारी होती. या प्रकरणात तपास यंत्रणेने मोहम्मद आसिफ आणि सादिक सराफ यांना आरोपी बनवले आहे. हे दोन्ही आरोपी मुस्लिम तरुणांना प्रशिक्षण तर देत होतेच. शिवाय सतत प्रशिक्षण शिबिरेही आयोजित करत होते.
मुस्लिम तरुणांमध्ये इस्लाम धोक्यात असल्याची भीती निर्माण करणे हे त्यांचे एकमेव काम होते. त्या भीतीतून त्यांना आपले दुकान चालवायचे होते, ते देशाचे तुकडे पाडण्याच्या तयारीत होते. याच मालिकेत २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याबाबतही चर्चा झाली होती. पण एनआयएने या कटाचा पर्दाफाश केला आणि आता पहिले आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. सध्या एनआयए एक नव्हे, तर अनेक प्रकरणांचा तपास करत आहे. काही दिवसांपूर्वी तपास यंत्रणा पीएफआयचे हवाला नेटवर्क उघड झाले होते. या प्रकरणी 5 आरोपींनाही अटक करण्यात आली होती.
पीएफआय २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवू इच्छित असल्याची बातमी आली होती. यासाठी ते मुस्लिम तरुणांची दिशाभूल करत आहे, त्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण देत आहेत. आता याच प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.
पीएफआय २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवू इच्छित असल्याची बातमी आली होती. यासाठी ते मुस्लिम तरुणांची दिशाभूल करत आहे, त्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण देत आहेत. आता याच प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.